Monday, April 25, 2011

सासवड विषयी थोडक्यात

कर्‍हेपठारावर १८०० - २१० उत्तर रेखांश व ७४० - १० पर्व अक्षांवर सासवड वसलेले आहे. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने या भूमीत गहन तप केले. ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली म्हणून तीस ब्रह्मपुरी म्हणत.

फार पूर्वी येथे सहा वाड्या (वस्त्या) होत्या.
वटेश्वरापाशी ‘वरखेडवाडी’, सिद्धेश्वरपाशी ‘सरडी’, सदतेहे बोरीचे पटांगण, ‘संवत्सर गांव’ सोपानदेवापाशी, ‘दाणे पिंपळगाव’ टाकमाई मंदीरापाशी, जुन्या भैरवनाथाजवळ ‘सनवडी’. कालमानाने या वाड्यांचे स्वरूप व विस्तार बदलून त्याचे सासवडनामे गावात रुपांतर झाले. या सहा वाड्यांचे सासवड असे नाव पडले असावे असाही एक तर्क आहे.

फार प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते, या सात वडांवरून हे गाव सातवड असे ओळखले जाई. कालांतराने सातवडचा उच्चार सासवड बनला असावा, असाही एक समज आहे.

शिवछत्रपतींच्या तीर्थरुपांचे हे जाहागिरीतील गाव. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरु पडले. आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करुन लढाईत धारातीर्थी पडलेला वीर पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आजही साक्ष देईल.

No comments:

Post a Comment