
कानिफनाथ मंदिर
नाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर सासवड पासून १५ किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे. बोपगाव पासुन उजवीकडे मंदिराची कमान लागते वेडी वाकडी वळणे घेत घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे.
थोड्या पायर्या चढून गेल्यानंतर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो, पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे. मुळचे मंदिर लहान आहे, मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या चौकटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते. आतमध्ये पंधरा वीस जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे. अधिक वाचा http://www.saswadkar.com/dharmik/kanifnath.html
कानिफनाथ, नारायणेश्वर महादेव व दत्तात्रय मंदिर तसेच पांडेश्वर मंदिराबद्दल अधिक माहितीसाठी अवश्य भेट द्या http://www.saswadkar.com/dharmik.html
No comments:
Post a Comment